महाराष्ट्र ग्रॅपलिंग पंचपरिक्षेत जिल्हयातील सात क्रीडापटूंचे यश .

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नाशिक येथिल मीनाताई ठाकरे क्रिडा संकूला तील ईष्मा स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लब, येथे राज्यस्तरीय अधिकृत ग्रॅपलिंग (मल्लयुद्ध) पंचपरिक्षेचे शिबिर दि .११ जुलैपासुन आयोजित करण्यात आले होते . त्यात वरणगाव येथिल हनुमान व्यायाम शाळेच्या तीन मल्लांनी तसेच भुसावळ व चाळीसगाव येथिल प्रत्येकी दोन मल्लांनी घवघवित यश मिळवले. त्यांना राज्य ग्रॅपलिंग संस्थेच्या अध्यक्षा अर्चना देशमुख व राज्य सचिव संतोष देशमुख तसेच तांत्रिक व पंच समीतीचे राज्य चेअरमन संदीप बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.

नाशिक येथे नुकतेच राज्यस्तरीय अधिकृत ग्रॅपलिंग संस्थेच्या पंच परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते . त्यात जळगाव जिल्हयातून ७ मल्लांनी व छत्रपती संभाजी नगर , पुणे , नाशिक येथिल मल्लांनी सहभाग घेतला होता. त्यात पैलवान संजय बावस्कर, उत्तम भोई , दिलीप संगेले,प्रणय बावस्कर,राजकिरण निकम , तसेच चाळीसगाव येथिल मल्ल बबलू चव्हाण , गणेश देवरे यांनी पंच परिक्षेत जळगाव जिल्ह्यातून घवघवीत यश मिळवले . त्यांचे सोबत बाळासाहेब चव्हाण आणि वस्ताद नामदेव मोरे यांनी सुद्धा शिबिराचा लाभ घेतला . सर्वांना ग्रॅपलिंग संस्थेतर्फे टि शर्ट , प्रमाणपत्र , व अधिकृत पंच ओळखपत्रे देण्यात आली आहेत . सर्वांचे जिल्हा ग्रॅपलिंग संस्थेतर्फे सदस्य महेन्द्र इंगळे ,सतिष मोरे , जितेन्द्र मोरे , यांनी अभिनंदन केले .
शालेय जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाला मान्यता असुन सर्व उत्तीर्ण पंचांना अधिकृत पेच म्हणून काम करण्याची संधी, राज्य संघटनेच्या अधिकृत स्पर्धा व टेक्निकल कमिटीमध्ये सहभागाची संधी ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कोर्ससाठी पात्रता प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होणार आहे .

