Thursday, July 16, 2026
Homeजळगावनगरपरिषद सर्वसाधारण सभेत विरोधी,सत्ताधारी गटात आक्रमक पद्धतीने चर्चा. १५० विकास कामांना मंजुरी.

नगरपरिषद सर्वसाधारण सभेत विरोधी,सत्ताधारी गटात आक्रमक पद्धतीने चर्चा. १५० विकास कामांना मंजुरी.

यावल नगरपरिषद सर्वसाधारण सभेत विरोधी,सत्ताधारी गटात आक्रमक पद्धतीने चर्चा.
१५० विकास कामांना मंजुरी.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि.१६
यावल नगरपरिषद सर्वसाधारण सभेत उपस्थित सर्व विरोधी,
सत्ताधारी गटातील नगरपरिषदp सदस्यांमध्ये आक्रमक पद्धतीने चर्चा होऊन १५० विकास कामांना मंजुरी देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आले.

नगरपालीका प्रशासना खरेदी केलेल्या महागड्या खूरच्यांची खरेदीच्या मुद्दयावरून गाजलेल्या सर्वसाधारण सभेत विविध १५० विकास कामांना मंजुरी देण्यात आली.येथील नगर पालीकेच्या सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष सईदाबी शेख तसेच मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सर्व साधारण वादळी सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात शहर विकासाच्या मुद्दांवर चर्चा करण्यात येवुन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली . यावल नगरपालीकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सर्वसाधारण सभेत यावल शहरातील विविध नागरी समस्या व विकासाच्या विषयांवर सत्ताधारी व विरोधक यांच्यात चर्चा झाली, यात शहरातील व विस्तारित वसाहतील होणारे नविन बांधकाम परवानगी, सन्मानिय नगर पालिका सदस्यां च्या आसन व्यवस्थेसाठी घेण्यात आलेल्या खुरच्या खरेदीसह आदि विषयांवर सभेत वादळी चर्चा होवुन अखेर १५०विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या सर्व साधारण सभेला शिवसेना गटाचे गटनेते सागर चौधरी,भारतीय जनता पक्ष नगरसेवक गटाच्या गटनेत्या सौ.नंदा महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेस (अप) गटाच्या गटनेत्या वर्षा चोपडे यांच्यासह नगरसेवक अतुल पाटील,नगरसेवक उमेश फेगडे,नगरसेवक हेमराज उर्फ बाळू फेगडे,नगरसेवक राकेश कोलते यांच्यासह आदींनी चर्चेत सहभाग घेतला,या सर्वसाधारण सभेत घर बांधकाम परवानगी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होणारी विविध विकासकामे नगरपालीका प्रशासनाच्या माध्यमातुन व्हावीत असा ठराव मतदानाने मंजुर करण्यात आला तसेच सत्ताधारी गटातील नगरसेवक सागर चौधरी यांनी अचानक सभागृहात नगरपालीका प्रशासनाने खरेदी केलेल्या महागडया खुरच्यांचा प्रश्न उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली या विषयावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली, दरम्यान नगराध्यक्ष सौ छाया पाटील यांनी

 


बोलतांना सांगीतले की,सदरच्या खुरच्या खरेदी करण्याबाबत चा ठराव मागील सभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला होता,असे असतांना ही जर खरेदीच्या किमती विषयी कुणाला शंका असेल तर त्यांनी रितसर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून चौकशी करावी असे नगराध्यक्ष सौ.छाया पाटिल या म्हणाल्यात. दरम्यान विकासकामांच्या मुद्दयावरून गाजलेल्या या सर्वसाधारण सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली,या सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने या वादळी सभेची सांगता झाली .

नगरसेवक सागर चौधरी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चुकीची निविदा रद्द – यावल नगर परिषदेने सन २०२६-२७
या आर्थिक वर्षाकरिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागाकरिता ई-निविदेसाठी योग्य पंजीबद्ध कंत्राटदार,विक्रेता,पुरवठादार, सेवा सहकारी संस्था,सेवाभावी संस्था यांच्याकडून निविदा
मागविण्यात आल्या होत्या.या निविदे मध्ये नगर परिषदेमार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियान विभागअंतर्गत घनकचरा
व्यवस्थापन,स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत विविध जनजागृतीकरिता सुंदर
यावल संकल्पना राबविणे व अनुषंगिक कामे करणे.सदर ई-निविदा ऑनलाईन http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि. ०४/०७/२०२६ ते दिनांक १०/०७/२०२६ रोजी पर्यंत
चुकीच्या पद्धतीने बेकायदा अटी शर्ती टाकून आमंत्रित केल्या होत्या.या बेकायदा अटी शर्ती कशा टाकल्या तसेच खुर्च्या खरेदी केलेल्या प्रकरणात वाजवीपेक्षा जास्त दराच्या खुर्च्या खरेदी केल्याने यावल शहरातील नागरिक नगरसेवकांना जाब विचारत असल्याने यावल नगरपरिषद प्रशासनाची मोठी घोड चुक झाल्याने नगरसेवक सागर चौधरी यांनी मोठ्या आक्रमक भूमिका मांडल्याने नगरपरिषद प्रशासनात मोठा गोंधळ उडाला आणि नगरपालिका प्रशासनाला झालेली चूक लक्षात आल्याने दि.४ जुलै २०२७ रोजी दैनिकातून प्रसिद्ध झालेली जाहिरात / निविदा रद्द करावी लागली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या