Thursday, July 16, 2026
Homeआरोग्यजिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीन चालकाने अन्नसुरक्षा विभागाचे सर्व नियम वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीन चालकाने अन्नसुरक्षा विभागाचे सर्व नियम वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीन चालकाने अन्नसुरक्षा विभागाचे सर्व नियम वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळले.

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दिनांक १६
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये वृत्तपत्रावर (न्यूज पेपरवर) खाद्यपदार्थ देऊन अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबतची तक्रार भुसावळ येथील प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी केल्याने कॅन्टीन चालकाने अन्न सुरक्षा विभागाचे सर्व नियम वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळल्याने अन्नसुरक्षा विभाग कारवाई करणार किंवा नाही याकडे लक्ष लागून आहे.

तक्रारदार प्रमोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये वडा-पाव, कचोरी व इतर तेलकट खाद्यपदार्थ थेट वृत्तपत्राच्या (न्यूज पेपरच्या) कागदावर देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागामार्फत वेळोवेळी छापील वृत्तपत्रावर किंवा मुद्रित कागदावर खाद्यपदार्थ देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. कारण छपाईतील शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

असे असताना,जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर आहे.शासनाच्या कार्यालयातच नियमांचे पालन होत नसेल, तर जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.
जिल्हाधिकारी यांनी आपल्या शासकीय यंत्रणेमार्फत आणि अन्नसुरक्षा विभागातर्फे
संबंधित कॅन्टीनची तात्काळ तपासणी करण्यात यावी.
वृत्तपत्रावर किंवा मुद्रित कागदावर खाद्यपदार्थ देण्याची प्रथा तात्काळ बंद करण्यात यावी.संबंधित कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तीवर लागू नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी.भविष्यात अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होईल, याबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात.या तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मला लेखी अथवा ई-मेलद्वारे माहिती कळवावी. अशा तक्रार वर्धा निवेदनात
भुसावळ येथील प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या