Thursday, July 30, 2026
Homeजळगावतुटलेल्या नाला कठड्यांवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश !

तुटलेल्या नाला कठड्यांवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश !

तुटलेल्या नाला कठड्यांवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव शहरातील विविध लहान-मोठ्या नाल्यांवरील तुटलेले तसेच अनेक ठिकाणी पूर्णपणे नसलेले संरक्षक कठडे (रेलिंग) नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत असल्याची दखल घेत उपमहापौर मनोज चौधरी यांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे मोठ्या प्रमाणात तुटले असून शहरातील अन्य अनेक ठिकाणीही अशीच धोकादायक परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.या मार्गांवरून दररोज शाळकरी विद्यार्थी, स्कूल बस, रिक्षा तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होत असल्याने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांत तुटलेल्या कठड्यांमुळे दुर्घटना घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यांना धोकादायक ठिकाणांची तात्काळ पाहणी करून फॅब्रिकेशनच्या माध्यमातून तात्पुरते संरक्षक कठडे उभारण्यासह आवश्यक त्या कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले, “नागरिकांचा, विशेषतः लहान मुलांचा जीव सुरक्षित ठेवणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. पावसाळ्यात कोणताही अपघात घडू नये, यासाठी बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम करून धोकादायक ठिकाणांवरील कठड्यांची दुरुस्ती व संरक्षण व्यवस्था तातडीने पूर्ण करावी.”
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या