Thursday, July 30, 2026
Homeजळगावगुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणारुपात संगोपनासहित झाडे लावण्याचा संकल्प करावा

गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणारुपात संगोपनासहित झाडे लावण्याचा संकल्प करावा

गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणारुपात संगोपनासहित झाडे लावण्याचा संकल्प करावा.                                      डॉ निसर्ग डॉ. सुरेंद्रसिंग पाटील                                  भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करतात. निसर्ग हाच गुरु आपण सर्व निसर्गाने निर्माण केलेले धरती मातेचे लेकरं आहोत एक प्रकारे मातीचे गोळे आहोत आपल्या संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु म्हणजे आपले आदर्श गुरूंमुळे आपली संस्कृती, माणुसकी टिकून आहे आपणास आकार देण्याचं काम गुरु करत असतात पहिले आई वडील, बालवयात संस्कार देणारे शिक्षक त्यानंतर आपले आई-वडील यांना प्रिय असलेले देवता तसेच गुरु यांचा आदर्श घेतो गुरूंमुळे आपल्या व मुलांच्याआचरणात भरपूर बदल होत चांगली भावना चांगले विचार येतात. प्रत्येक गुरुंनी निसर्गाला गुरूंचं,वृक्षाला दैवी रूपाचं, धरतीला भूमातेच स्थान दिलेल आहे. झाड म्हणजे प्राणवायूचा स्त्रोत, औषधांचा भंडार, जल व जीवनाचं रक्षक आपण नमस्कार करत असलेल्या गुरूंचा फोटो वृक्ष देवता म्हणजे झाडाखाली धरतीवर बसून ध्यान करतानाचाच असतो. झाडे म्हणजे सद्यस्थितीत काही कारणास्तव मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, वन व जंगल क्षेत्रात तसेच निसर्गनिर्मित साधन संपत्तीत होत असलेली घट त्यामुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन अनेक आपत्तींचा सामना करावा लागत असून निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे . तरी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेला गुरूंना गुरुदक्षिणेच्या रूपात आपण मानत असलेल्या गुरूंना प्रिय असलेले वृक्ष म्हणजे झाडाचे रोप आपल्या परिसरात अथवा जिथे जागा असेल तेथे त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेत लावण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवडीमुळे निसर्गाचे काही देणेही होईल तसेच ॔एक पेड माँ के लिये॓॓॓अभियानातही सहभाग दिसेल. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांचे गुरु पोर्णिमेच्या निमित्त हे आवाहन प्रत्येकाने स्वीकारल्यास गुरूंना निसर्गाच्या सान्निध्यात प्राणवायु देणारी गुरु दक्षिणा मिळेल

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या