भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आषाढ पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रमिला किशोर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली लुंबिनी बुद्ध विहार, लुंबिनी नगर वरणगाव येथे आषाढ पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ करण्यात आला. बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित” बुद्ध आणि त्यांचा धम्म” या पवित्र धम्मग्रंथाचे आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत पठण करण्यात येणार आहे.
प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून दीप धूप प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर भंते नंद यांनी उपस्थित उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील देऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करण्यात आले.
प्रमिला किशोर भालेराव जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी उपस्थितांना आषाढ पौर्णिमा आणि वर्षावास प्रारंभ दिनाच्या मंगल कामना देऊन संबोधित केले. प्रसंगी डॉ . भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (AMSC) चे किशोर भालेराव महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष, मनीष साबळे AMSC जिल्हाध्यक्ष, गौतम बोदडे AMSC जिल्हा समन्वयक, आणि भारतीय बौद्ध महासभेचे सुनील वाघ , जिल्हा मीडिया समन्वयक, वासुदेव सुरवाडे भुसावल तालुका अध्यक्ष, प्रमिला संजय गुरचळ भुसावळ तालुका सचिव ,यांची उपस्थिती होती. या मंगल प्रसंगी लक्ष्मण भालेराव,छाया वाघ, वंदना तायडे, माया गायकवाड,योगिता कोचुरे, संगीता सुरवाडे, विमल सुरवाडे, ज्योती सोनवणे, बाबुराव बौद्धजाल सोनवणे, यांचे सहकार्य लाभले. तसेच लुंबिनी नगर, वरणगाव, फुलगाव, तळवेल, रमाबाई हौसिंग सोसायटी, पुष्पलता नगर परिसरातील उपासक उपासीका यांनी या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती देऊन धम्मदेसनेचा लाभ घेतला. या वर्षावास कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे .

