भुसावळ विभागात 31 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील “वसुधरा” सभागृहात सेवानिवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सेवानिवृत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात भुसावळ विभागातील विविध विभागांतील 31 रेल्वे कर्मचारी भारतीय रेल्वेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा-निवृत्तीशी संबंधित सर्व देयकांचे तात्काळ वितरण सुनिश्चित करत सुमारे ₹17 कोटींची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. यावेळी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते, त्यामुळे समारंभ भावनिक आणि आत्मीय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दीर्घ, समर्पित आणि उत्कृष्ट सेवेसाठी अभिनंदन करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, सुखी, समृद्ध आणि सक्रिय आयुष्यासाठी शुभेच्छा देत जीवनाच्या नव्या पर्वासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.
समारंभादरम्यान उत्कृष्ट व सुरक्षित कार्यनिष्पादनाबद्दल पाच रेल्वे कर्मचाऱ्यांना “अपघातमुक्त सेवा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) तसेच वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हा समारंभ अत्यंत सौहार्दपूर्ण, भावनिक आणि गरिमामय वातावरणात संपन्न झाला.

