.कुऱ्हा(पानाचे)कृषिकन्या कडून कुकडं पालन व्यवसायचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या कुऱ्हा (पानाचे)येथे संत मुक्ताई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत यजमान शेतकऱ्यांसाठी प्रमुख व्यवसाय कुकडं पालनया विषयांवर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. त्या मध्ये कृषिकन्या कुकडं पालनसाठी खाद्य कस दयाच,
खाद्य देतांन कोणती काळजी घ्यावी, किती दिवसात कोणती लस व कोणती लस कोणत्या रोगा साठी वापर केला जातो .
या लसीकरण च प्रक्रियेचे महत्त्व,
लसीकरण साठी थंड बर्फाचे तुकडे मध्ये ठेवणे
लसीकरण देताना नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे.
गुरे आजारी असेल तर देऊ नयेत. अशी माहिती देण्यात आली
.या उपक्रमात महाविद्यालयाच्या अंजली पावरा, सृष्टी महाले,रूबीना तडवी, दिशा गंगावणे आणि मोहिनी खैरनार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभव मिळत असून शेतकरी व विद्यार्थिनी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होत आहे.
संपूर्ण उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड आणि डॉ. प्रीती दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

