Saturday, August 1, 2026
Homeजळगावमहिला महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

महिला महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.

महिला महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी.
जळगाव येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयात कला व सांस्कृतिक समिती अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त डॉ. प्रकाश कांबळे व डॉ. दीपक शिरसाठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात या थोर पुरुषांचे एक मूल्य जरी स्वीकारले तरी समाजात आपण बदल घडवून आणू शकतो असे सांगितले.
डॉ. दीपक शिरसाठ यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की लोकमान्य टिळकांनी जनमानसात वैचारिकता निर्माण केली आणि हा वारसा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य यातून जनमानसात पोहोचविला .डॉ.प्रकाश कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांना अक्षर ओळख नसतानाही प्रतिभेच्या जोरावर असामान्य वास्तववादी साहित्य समाजासमोर मांडले असे सांगितले. हा कार्यक्रम सांस्कृतिक समिती अंतर्गत घेण्यात आला. दोन्ही नेत्यांनी समाजाला दिशा दाखविली त्यांचे विचार तरुणांनी अंमलात आणावे . असे मान्यवरांच्या मनोगतातून सांगण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव भालेराव यांनी केले तर आभार प्रा. रेणुका झांबरे यांनी मानले.या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव ,सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या