Sunday, August 9, 2026
Homeजळगावजे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधे आदिवासी दिवस उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधे आदिवासी दिवस उत्साहात साजरा.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधे आदिवासी दिवस उत्साहात साजरा.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि.९
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन होत्या.
रंजना महाजन यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण केले.प्राचार्या दिपाली धांडे मॅडम शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरुड यांनी व शाळेच्या सहकारी शिक्षिका संध्या पांडव व रेशमा पाटील यांनी आदिवासी दिनानिमित्त श्री बिरसा मुंडा यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.इयत्ता ४ थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान केली होती.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका फेगडे यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षाली बारी यांनी केले.कार्यक्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या