इनरव्हील क्लब तर्फे गर्भवती महिलांना पोषण आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे नगरपालिकेच्या दवाखान्यात गर्भवती महिलांसाठी जनजागृती व पोषण आहार वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी गर्भवती महिलांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. डॉ. कीर्ती फल टणकर मॅडम यांनी स्तनपानाचे महत्त्व तसेच आई आणि बाळाच्या आरोग्यास होणारे फायदे समजावून सांगितले. तसेच गर्भावस्थेत महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि प्रसूतीनंतर नवजात बाळाची योग्य प्रकारे कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमातून गर्भवती महिलांमध्ये योग्य पोषण, स्तनपानाचे महत्त्व आणि माता-बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास अध्यक्षा योगिता वायकोळे, सचिव कविता पाचपांडे तसेच सदस्य प्रतीक्षा पाटील, नीता अहिरराव, कविता हिरोडकर आणि रंजना यावलकर उपस्थित होते.

