Tuesday, August 11, 2026
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अनवेशन) पुरस्काराने पोलीस निरिक्षक दिनेश लबडे यांचा सन्मान...

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अनवेशन) पुरस्काराने पोलीस निरिक्षक दिनेश लबडे यांचा सन्मान गौरव; कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अनवेशन) पुरस्काराने पोलीस निरिक्षक दिनेश लबडे यांचा सन्मान गौरव; कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती

चिमूर : गुन्ह्यांच्या तपासात

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 उत्कृष्ट प्राविण्य आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांना भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या ‘गुन्हे तपासातील उत्कृष्ट कामगिरी’ पुरस्काराने शनिवारी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. . या पुरस्कारामुळे चिमूर पोलीस ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी सन २०१८ पासून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. गुन्ह्याची उकल, तपासातील अचूकता, पुराव्यांचे संकलन, वैज्ञानिक व तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर तसेच तपासातील उल्लेखनीय प्राविण्य या बाबींच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेतली जाते. सन २०२१ मध्ये नागपूर येथील पोलीस स्टेशन चे हद्दीत एक १२ वर्षीय बालकाचे खंडणी साठी अपहरण करून त्याचा निर्घण खून करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात कुणाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सुद्धा केवळ फॉरेन्सिक, इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल आणि

 

परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर केलेल्या उत्कृष्ट दोषारोप पत्रामुळे न्यायालयाने आरोपीस दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा ठोठावली होती. कुठलाही पुरावा नसताना केवळ वैज्ञानिक साधनांचा वापर करून दोषसिद्धी मिळवणारे हे प्रकरण दुर्मिळ ठरले. काल झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग सुनील रामानंद, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त (दळणवळण व माहिती तंत्रज्ञान) दीपक पाण्डे, अपर पोलिस महासंचालक सुधारगृह सुहास वारके, विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे पूर्व) सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम) सुधीर हिरेमठ तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे श्रीकांत पाठक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या

 

Oplus_131072

उल्लेखनीय तपास कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाल्याने चिमूर तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गुन्हे तपासातील उत्कृष्टतेला मिळालेला हा सन्मान पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असून, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास या पुरस्कारामुळे पोलिस दलाचा आत्मविश्वास वाढणार आहे. या पुरस्काराने इतर अधिकारी यांना कार्यात बळ मिळणार आहे . दिनेश लबडे यांचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या