व्हिडीओ कॉल करीत भिती दाखवुन लुबाडणाऱ्या पासुन रहा सावध : टिना पाटील.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१२
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे ज्योती विद्या मंदिर शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
सद्या व्हीडीओ कॉलवर आपण पोलिस अधिकारी अाहोत असे सांगत भिती दाखवुन डीजीटल अरेस्टच्या नावाने लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे.अशा कोणत्याच प्रकारची डीजीटल अरेस्ट होत नाही, तेव्हा असे कॉल आल्यास स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी आणी आपली फसवणुक टाळावी असे प्रतिपादन सायबर तज्ज्ञ टिना पाटील यांनी केले त्या सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
सांगवी बुद्रुक ता. यावल येथे ज्योती विद्या मंदिर शाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर शिक्षा व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सोमवारी हा कार्यक्रम पार पडला यात हॅकर मास्क च्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रात्यक्षिक सायबर तज्ज्ञ टीना पाटील आणि दर्शना चौधरी सादर केले. व्हीडीओ कॉलवर आपण पोलिस अधिकारी अाहोत असे सांगत भिती दाखवुन डीजीटल अरेस्टच्या नावाने लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे. त्या पासुन सुरक्षीत राहण्याचे आवाहन टिना पाटील यांनी केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देताना केवळ व्याख्यान न देता समाजा आजवर कशा प्रकारे प्रत्येक्षात नागरीकांच्ना सायबर ढगांनी फसवले याची माहिती दिली. तसेच हॅकर मास्कच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार लोकांना कशाप्रकारे आकर्षक संदेश पाठवतात, बनावट लिंक किंवा फोन कॉलच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करतात, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.यावेळी ओटीपी, युपीआय फिशिंग, क्युआर कोड, केवायसीच्या माध्यमातुन फसवणुक, सोशल मीडिया, फोटो मॉर्फिंग, बनावट अकाउंट, पासवर्ड चोरी आणि ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक आर.एस. भंगाळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत उपमुख्यध्यापक चंद्रकांत फिरके हे होते तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रसेनजित बाविसकर यांनी मानले
क्लिक करण्यापूर्वी विचार करा.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सोशल लनेटवर्कवर अनेक गृप वर लींक टाकलेल्या असतात त्यांना क्लिक करण्यापूर्वी विचार करावा अनोळखी लिंक ओपन केल्या मोबाईल हॅक होवु शकतो तसेच ओटीपी हा कुणा सोबत शेअर करू नका सायबर क्षेत्रात अनेक प्रकारे फसवणुक होवु शकते मात्र, आपण कसे सुरक्षीत रहावे याची माहिती व मार्गदर्शन प्रसंगी करण्यात आले.-पुर्ण-फोटो आहे

