Thursday, August 13, 2026
Homeकृषीक्रांतिकारी शेतकरी संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांची निवड

क्रांतिकारी शेतकरी संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांची निवड

क्रांतिकारी शेतकरी संघटना भुसावळ तालुकाध्यक्षपदी माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी यांची निवड
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वाखालील क् अधिकारी दिलीप चौधरी साहेब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील व जळगाव जिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिलीप चौधरी यांच्या निवडीमुळे तालुक्यात शेतकरी चळवळीला मोठी ताकद मिळणार आहे.
दिलीप चौधरी यांनी आपल्या शासकीय सेवेच्या काळात नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा शेतकऱ्यांशी असलेला संपर्क आणि कामाचा पिंड कायम आहे. त्यांच्या याच सामाजिक जाणिवेची आणि अनुभवाची दखल घेऊन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील व जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाने संघटनेने त्यांच्यावर भुसावळ तालुक्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीनंतर बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष दिलीप चौधरी म्हणाले की, “मी शासकीय सेवेत असतानाही नेहमीच शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करत होतो आणि आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हीच सेवा कायम पुढे सुरू ठेवणार आहे. रविकांत भाऊ तुपकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील व जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्क आणि न्यायासाठी आपण सदैव रस्त्यावर उतरून संघर्ष करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
दिलीप चौधरी यांच्या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष शरद पाटील, तालुक्यातील शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या