Friday, August 14, 2026
Homeजळगावस्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ व वरणगाव येथे तिरंगा रॅली

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ व वरणगाव येथे तिरंगा रॅली

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ व वरणगाव येथे तिरंगा रॅली

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ व वरणगाव येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आल्या .
वरणगाव येथे काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे,पण अध्यक्ष अरुणा इंगळे , मुख्याधिकारी राहुल भोये ‘ नगरसेवक पक्षाचे गटनेतेविविध पक्षाचे पदाधिकारी , नागरिक तसेच महात्मा गांधी विद्यालयात जी .एस चौधरी विद्यालय फक्रुद्दीन अली उर्दू शाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . यावेळी भव्य तिरंगा ध्वज घेऊन भव्य रॅली काढण्यात आली होती. शिवतिर्था वर रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले .

भुसावळ येथे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असताना भुसावळ शहरातही शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भव्य तिरंगा ध्वजाने रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहराचा परिसर दणाणून गेला.

भाजप भुसावळ विधानसभा क्षेत्राच्या वतीने सकाळी ९ वाजता जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर पी.ओ. नाहाटा महाविद्यालयाजवळील शहीद राकेश शिंदे स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीमध्येप्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे गटनेते युवराज लोणारी ,प्रतिष्ठान महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी सावकारे ,भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच प्रतिष्ठा महिला मंडळासह विविध महिला मंडळांच्या महिला भगिनी, बियाणी स्कूल, ताप्ती पब्लिक स्कूल, म्युनिसिपल हायस्कूल यांसह विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी भारतमातेचा जयघोष करत देशभक्तीचा संदेश दिला. ‘एक तिरंगा, एक भारत, एक भावना’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या