Friday, October 16, 2026
Homeजळगावबालाजी ग्रुपतर्फे १५ ऑगस्टला महाप्रसादाचे आयोजन

बालाजी ग्रुपतर्फे १५ ऑगस्टला महाप्रसादाचे आयोजन

भुसावळात बालाजी ग्रुपतर्फे १५ ऑगस्टला महाप्रसादाचे आयोजन
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  दि 14 बालाजी ग्रुप, जुना सातारा, भुसावळ यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिभावाने आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादाचा लाभ शहरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बालाजी ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, जळगाव रोडवरील रामानंद पॅलेस, सृष्टी ट्रेडर्ससमोर, भुसावळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.
भगवान बालाजींच्या कृपाशीर्वादाने आयोजित या धार्मिक उपक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
आयोजक : बालाजी ग्रुप, जुना सातारा, भुसावळ

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या