Friday, August 21, 2026
Homeजळगावनगरसेविका वैशाली बारी यांच्या घरी खानदेशच्या आराध्य दैवत कानबाई मातेचे आगमन.

नगरसेविका वैशाली बारी यांच्या घरी खानदेशच्या आराध्य दैवत कानबाई मातेचे आगमन.

नगरसेविका वैशाली बारी यांच्या घरी खानदेशच्या आराध्य दैवत
कानबाई मातेचे आगमन.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी           दि.२१
खान्देशचे आराध्य दैवत म्हणून कानबाई माता यांना विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. खान्देशातील अनेक कुटुंबांमध्ये कानबाई मातेची श्रद्धेने पूजा केली जाते. विशेषतः श्रावण महिन्यात कानबाई उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. याच मुख्य हेतूने
यावल येथे आज नगरसेविका सौ.वैशाली निलेश बारी यांच्या कडे खान्देशची आराध्य दैवत कानबाई मातेचे आगमन वाजत गाजत मोठ्या उत्साहात झाले. आगमन प्रसंगी या शहरातील व परिसरातील महिला व पुरुष यांनी मातेचे जलोष्यात स्वागत केले

कानबाई माता ही कुटुंबाचे रक्षण, सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराट देणारी देवी म्हणून मानली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक व आप्तेष्ट एकत्र येतात, त्यामुळे कुटुंबातील एकोपा आणि खान्देशची लोकपरंपरा जपण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणूनही कानबाई उत्सवाकडे पाहिले जाते.
थोडक्यात, कानबाई माता ही खान्देशच्या श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या