Friday, August 21, 2026
Homeजळगावजोगलखेडे-भानखेडे जि.प. शाळेत रक्तगट तपासणी शिबिर

जोगलखेडे-भानखेडे जि.प. शाळेत रक्तगट तपासणी शिबिर

जोगलखेडे-भानखेडे जि.प. शाळेत रक्तगट तपासणी शिबिर

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील जोगलखेडे व भानखेडे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन जोगलखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पंकज पाटील यांच्या हस्ते झाले. चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माणिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मनिष ईश्वरकर, डॉ. प्रियंका धानोरकर, लॅब टेक्निशियन प्रविण उगले तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर विनोद पांढरे, सुमित महाजन, राजेश राऊत आणि तेजस्विनी देशमुख यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक त्या विद्यार्थ्यांना औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्तगटाची माहिती मिळण्यासोबतच आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यास मदत झाली.
यावेळी जोगलखेडे शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र झांबरे, भानखेडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश फेगडे, उपशिक्षिका सोनाली तायडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या