Friday, August 21, 2026
Homeजळगावभुसावळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा

भुसावळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा

भुसावळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी पंचायत समिती भुसावळ येथील गट साधन केंद्राला (बीआरसी) भेट दिली. यावेळी त्यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेत गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच बीआरसी कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

या बैठकीस गटशिक्षणाधिकारी किशोरजी वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी. धाडी, तुषार प्रधान तसेच केंद्रप्रमुख उषा देसले, प्रवीण राणे, किशोर चौधरी, शरद पवार, मोहसीन काझी आणि राजेश पाटील उपस्थित होते.
‘निपुण महाराष्ट्र’ अभियानात भुसावळ तालुक्याने जळगाव जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करत अव्वल स्थान मिळविल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी किशोरजी वायकोळे व त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. भुसावळ तालुक्याप्रमाणेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेची पातळी उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विविध शाळांना भेट देत पाहणी – –
दौऱ्यादरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दर्यापूर येथे भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, कोथळी येथील शैक्षणिक उपक्रमांचा आढावाही घेतला. भुसावळ येथील पु. ग. बऱ्हाटे शाळेत सुरू असलेल्या इयत्ता सहावीच्या प्रशिक्षण वर्गालाही त्यांनी भेट दिली.
विविध शाळांच्या भेटीनंतर शाळांमधील एकंदरीत शैक्षणिक गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या