Thursday, September 3, 2026
Homeजळगावभुसावळ येथे करणी सेनेचा आक्रोश; स्वरा भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भुसावळ येथे करणी सेनेचा आक्रोश; स्वरा भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भुसावळ येथे करणी सेनेचा आक्रोश; स्वरा भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

राणी पद्मावती यांच्याबाबतच्या वक्तव्याचा निषेध; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत जाहीर माफीची मागणी

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     राणी पद्मावती यांच्याबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध नोंदवत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने गुरुवारी, दि. ३ सप्टेंबर रोजी भुसावळ येथे आंदोलनात्मक भूमिका घेतली. या वक्तव्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करीत संबंधित वक्तव्याबाबत स्वरा भास्कर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांनी राजपूत समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

या संदर्भात करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळ प्रांताधिकारी यांची भेट घेऊन निवेदन साद केले. राणी पद्मावती या राजपूत समाजाच्या अस्मितेचे आणि शौर्याचे प्रतीक असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या संदर्भात करण्यात आलेले आक्षेपार्ह किंवा अवमानकारक वक्तव्य समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित वक्तव्याची दखल घेऊन त्याची योग्य ती चौकशी करावी आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. तसेच भविष्यात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, राजघराणी आणि समाजाच्या श्रद्धास्थानांबाबत वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी करणी सेनेचे पदाधिकारी दामोदर राजपूत, आनंदा राजपूत, संदीप राजपूत, सारिकाताई राजपूत, हर्षल राजपूत, कविताताई राजपूत, प्रदीप राजपूत, जयश्रीताई राजपूत, नितीन राजपूत, सुरेश राजपूत, मोहिनीताई राजपूत, सुवर्णा राजपूत, स्मिताताई राजपूत, प्रियंकाताई राजपूत, श्रद्धाताई राजपूत, प्रतीक्षाताई राजपूत, पंकज राजपूत, गोकुळ राजपूत यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, संबंधित वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करणी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या