पी. एम. श्री जि. प. उर्दू शाळा बाॅ. न. 1 रावेर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
रावेर तालुका खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर : पी. एम. श्री. जि. प. उर्दू शाळा बाॅ. क्र. १, रावेर येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मो. आरिफ अब्दुल मजीद सर यांनी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचा गुलपुष्प देऊन सत्कार केले इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे, कविता व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी शाळेतील शिक्षक अ.सलाम सर रईस सर युनूस सर अजिज सर गुलरेज सर अजहर सर इरफान सर नावेद सर व अंशकालीन शिक्षक वसीम सर अजहर सर कयाम सर यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन विकार सर यांनी केले आभार मुख्तार सार यांनी माणले.

