Monday, September 7, 2026
Homeजळगावकुऱ्हे पानांचे येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. 

कुऱ्हे पानांचे येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. 

कुऱ्हे पानांचे येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.                                                           भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            तालुक्यातील कुऱ्हे पानांचे येथे जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी माजी जि प सदस्य समाधान पवार अध्यक्षस्थानी होते तसेच प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त एसटी वाहक विकास भाऊ चौधरी हे होते. उल्लेखनिय काम करणाऱ्या शिक्षकांना सत्कार करून

 

गौरवण्यात आले तसेच मेघश्याम सपकाळे सर यांना विशेष सन्मान करण्यात आला त्याच्या कडे पूर्वी केंद्रप्रमुख म्हणून चार्ज होता तसेच विषय तज्ञ म्हणून त्यांची ओळख जिल्हा परिषद मध्ये आहे , पूर्वीच्या गावी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते या सर्व बाबींचा विचार करून त्यांना गौरवण्यात आले. मुख्याध्यापिका वनिता सोनवणे यांनी आपल्या स्वखर्चातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाची भेट म्हणून आय कार्ड चे वाटप केले त्यांचे व्यवस्थापन समिती व पालकांमधून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश शिंदे , उपाध्यक्ष मनीषा अटक ,डॉ टी टी बारी, चंद्रकांत बावस्कर, उज्वला कोळी, ममता महाजन माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष प्रमोद उंबरकर, शिक्षक संतोष तायडे, शारदा मशाने, अनिता भोई, शालिनी चौधरी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या