जय गणेश फाउंडेशन तर्फे गणेशभक्तांसाठी सांस्कृतिक मेजवानी
भुसावळ- खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती गणेशोत्सवात यंदा अकरा दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यांत धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती फाउंडेशनच्या सांस्कृतिक आघाडीच्या पदाधिकारी यांनी कळवली आहे.
जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपतीच्या श्रींची स्थापना सोमवारी ( दि.१४ ) रोजी सायंकाळी सहा वाजता होईल. नवसाचा गणपती मंदिर, सुरभी नगर येथून मंगल वाद्यांच्या सुरात मिरवणूक काढून मुख्य मंडपात श्रींची स्थापना केली जाणार आहे.१५ सप्टेंबर ला सायं.सहा वा.परिभ्रमण त्रिपदी परिवारातर्फे त्रिपदी पठण आणि सात वा. सामूहिक विष्णू सहस्रनाम जाप यज्ञ होईल. दि.१६ ला दुपारी चार वा. स्लो सायकलिंग स्पर्धा आणि सहा वा. चिंतामणी गणेश मंडळ गणपती अथर्वशीर्ष सादर करणार आहेत तर सात वा. सामूहिक शंखनादाचा गजर होईल. दि.१७ सप्टेंबर ला दुपारी तिनला सुदृढ बालक स्पर्धा आणि रात्री आठ वा. टीव्ही गायक देवेंद्रसिंग ठाकूर यांचा हिंदी, मराठी भजनांचा भजन संध्या कार्यक्रम होईल. दि.१८ सप्टेंबर ला रात्री आठला नाटयवाईक कला ग्रुप महाराष्ट्राची लोकधारा ह्या कार्यक्रमात भारुडातून प्रबोधन करणार आहे. १९ सप्टेंबर ला शनिवारी दुपारी तीन वाजता रांगोळी स्पर्धा, चार वाजता स्मरणशक्ती स्पर्धा आणि रात्री आठ वाजता छोट्या व मोठ्या गटातील कलाकारांची सोलो डान्स स्पर्धा होईल. तर रविवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता विद्यार्थ्यांसाठी रंगभरण तर दहा वाजता “आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप” ह्या विषयावर निबंध स्पर्धा होईल. दुपारी चार वाजता काटदरे फ्रुड्स आयोजित महिलांसाठी “होम मिनिस्टर” स्पर्धा आणि रात्री आठ वाजता छोट्या व मोठ्या गटातील ग्रुप डान्स स्पर्धा होईल. सोमवारी २१सप्टेंबर ला दुपारी ४ ते १० ह्या वेळेत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय कडून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात येणार आहे, रात्री आठ वाजता “जेन झी टू जेन अल्फा विथ गणपती बाप्पा” हा प्रबोधनात्मक चर्चासत्राचा कार्यक्रम होईल. दि.२२ सप्टेंबर ला दुपारी तीन ला सत्यनारायण महापूजा तर रात्री आठला कराओके सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल. २३ सप्टेंबर ला रात्री आठ वाजता स्वराविष्कार ह्या अनोख्या कार्यक्रमात १०८ कलावंतांच्या कलेचे सामूहिक सादरीकरण होईल, तर बुधवारी २४ सप्टेंबर ला रात्री आठ वाजता “पोटात दुखतंय” ही भन्नाट विनोदी नाटिका आणि त्यानंतर विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.
नशामुक्ती जनजागृती- संकल्प प्रतिज्ञा…. व
विविध समस्यांनी जखडलेली “भारत माता की पुकार” ही नाटिका
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ तर्फे दि.२२ ते २४ ला रात्री आठ वाजता सादर केली जाईल.
चौकट-
*विसर्जन मिरवणुकीत संस्कृतीचे दर्शन*
दि.२५ सप्टेंबर ला सकाळी १० वाजता बाप्पांची विसर्जन मिरवणूक पालखीतून पारंपरिक वाद्य व वारकरी दिंडीच्या गजरात निघणार आहे.

