Monday, September 7, 2026
Homeजळगावभुसावळ शहराध्यक्षपदी कमलेश चौधरी यांची निवड

भुसावळ शहराध्यक्षपदी कमलेश चौधरी यांची निवड

भुसावळ शहराध्यक्षपदी कमलेश चौधरी यांची निवड
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहराच्या राजकीय संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून कमलेश चौधरी यांची भुसावळ शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भुसावळ येथील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष संतोष शेलोडे यांच्या हस्ते कमलेश चौधरी यांना शहराध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष शेलोडे यांनी कमलेश चौधरी यांचे अभिनंदन करून आगामी काळात शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

 


नवनियुक्त शहराध्यक्ष कमलेश चौधरी यांनी मराठी पत्रकार संघाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. शहरातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीप्रसंगी जिल्हा सचिव मनोहर लोणे, तालुकाध्यक्ष सुरेश महाले, विनोद गोरधे, आकाश ढाके, किशोर सावळे, प्रकाश पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी कमलेश चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कमलेश चौधरी यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ शहरातील मराठी पत्रकार संघटनेला नवी दिशा मिळणार असून आगामी काळात शहरातील विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांना अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या