श्रीकृष्णांच्या संदेश आचरणात आणूया प्रेम एकता आणि संस्कारांनी समाज घडवूया..
जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी कुटुंबातील कलह दूर करा . मोबाईल हे ज्ञान आणि प्रगतीचे साधन आहे . वृक्ष लावा नद्या स्वच्छ ठेवा व्यसनमुक्त समाज घडवा.
भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून धर्म , प्रेम , कर्तव्य ,सदाचार आणि समाज जागृतीच्या संदेश देणारा पवित्र पर्व आहे .जेव्हा समाजात अधर्म आणि दुष्ट प्रवृत्ती वाढतात तेव्हा ईश्वर अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि अधर्माच्या नाश करतात .
आजच्या काळात श्रीकृष्णांच्या प्रेम आणि एकतेच्या संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे . कुटुंबात परस्पर प्रेम , आदर आणि सन्मान असावा .छोट्या छोट्या कारणांवरून घरात कलह न करता संवादातून प्रश्न सोडवावेत .
मोबाईलच्या योग्य वापर ज्ञान आणि प्रगतीसाठी करावा मात्र त्याच्या अतिरेकामुळे कुटुंबीयांपासून आणि प्रत्यक्ष नात्यांपासून दुरावू नये .
एक झाड लावा ,निसर्ग वाचवा .
जन्माष्टमीच्या निमित्ताने वृक्षरोपण ,पर्यावरण संवर्धन ,आणि नदी जलस्रोत स्वच्छतेच्या संकल्प करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
युवाशक्तीने व्यसनापासून दूर राहून शिक्षण , संस्कार , सेवा आणि समाज हिताच्या कार्यात योगदान द्यावे*.
देव देश धर्मासाठी एकत्र येणे ही काळाची गरज.
समाजात प्रेम बंधुभाव आणि एकता वाढवून देव देश आणि धर्माच्या मूल्यांसाठी सकारात्मक व सेवाभावी भावनेने एकत्र येण्याचे आवाहन या जन्माष्टमीच्या निमित्ताने करण्यात येत आहे .
श्रीकृष्णाची पूजा केवळ मंदिरात नको त्यांचे विचार आपल्या आचरणात आणूया घरात प्रेम , समाजात एकता , निसर्गाची सेवा आणि जीवनात संस्कार हीच श्रीकृष्णांना खरी मानवंदना*…
या आनंदोत्सव च्या शुभ प्रसंगी, नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन , जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, तहसीलदार नाना साहेब आगळे, दीपक तायडे , रवींद्र महाजन, स्वप्नील पाटील, जितेंद्र राजनकर, विश्वनाथ चव्हाण, संजय सूर्यवंशी, दीपक चव्हाण, प्रवीण जाधव, संजय कोळी, रवींद्र पवार, व शेकडो भक्त उपस्थित होते तर दीपक महाराज, सुनील राठोड, बद्रीनाथ पवार, यांनी परिश्रम घेतले

