Tuesday, September 8, 2026
Homeजळगावभुसावळच्या मुकुटात शिरपेच प्रवीण नायसे यांना जेआरएफ प्राप्त

भुसावळच्या मुकुटात शिरपेच प्रवीण नायसे यांना जेआरएफ प्राप्त

भुसावळच्या मुकुटात शिरपेच प्रवीण नायसे यांना
जेआरएफ प्राप्त
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             शहरातील साधारण परिवारातील प्रवीण नायसे याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे देशभरात घेण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (UGC-NET) मराठी विषयातून अत्यंत प्रतिष्ठेची ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप’ (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदाची पात्रता संपादन केली आहे.
राज्यातून अत्यल्प जणांना असे यश संपादित करता आले आहे.
उच्च शिक्षणातील अध्यापन आणि उच्च दर्जाच्या संशोधनासाठी UGC-NET ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या मोजक्याच गुणवंत विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे JRF ही प्रतिष्ठेची संशोधन फेलोशिप प्रदान करण्यात येते. या फेलोशिप अंतर्गत पात्र संशोधकाला पीएच.डी. संशोधन कालावधीत पूर्णवेळ आणि स्वतंत्रपणे संशोधन करता यावे यासाठी दरमहा निश्चित विद्यावेतन, शहराच्या वर्गवारीनुसार घरभाडे भत्ता (HRA) तसेच वार्षिक आकस्मिक संशोधन खर्चाचे भरीव आर्थिक पाठबळ केंद्र सरकारतर्फे दिले जाते.
UGC-NET परीक्षेत प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी गुणवत्ता यादीतील अव्वल ६% विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरतात, तर त्यातूनही सर्वोच्च ०.६% गुणवंतांना JRF प्रदान केली जाते. प्रवीण यांनी यात यश संपादित केले.
नुकतेच दिल्लीच्या राष्ट्रीय व्यासपीठावर
प्रवीण नायसे यांनी आपले रिसर्च पेपर सादर केले.
दिल्लीच्या राष्ट्रीय परिषदेत विदवत्तेचा ज्ञान ,संशोधन आणि इतिहासाच्या राष्ट्रीय व्यासपीठावर प्रवीण नायसे यांनी थेट देशाची राजधानी दिल्लीत झेप घेतली आहे. प्रतिष्ठित जवाहर नेहरू विद्यापीठाच्या आयोजित राष्ट्रीय परिषदेत प्रवीण नायसे यांनी” मोहम्मद बिन कासीम से औरंगजेब तक भारत के इस्लामिक शासको कि मूल विचारधारा तथा धार्मिक नीतिया और ‘हिंदू स्वराज कि आवश्यकता ” या विषयावर हिंदी भाषेतून रिसर्च पेपर सादर केले.
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक हे पुस्तक प्रवीण नायसे यांनी लिहिलेले असून गेल्या वर्षी राष्ट्रपती भवन येथे भारत आणि सहा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. केंद्र सरकारने देशातील प्रमुख भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर केलेले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या