महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सचा सैनिकी प्रशिक्षण शिबिरात सहभाग
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव : १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव यांच्या वतीने भुसावळ येथील मिलिटरी कॅम्प, आरपीडी परिसरात CATC-116 एनसीसी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथील एनसीसी कॅडेट्स उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
या शिबिराच्या माध्यमातून सहभागी कॅडेट्सना विविध प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये शस्त्र प्रशिक्षण, फायरिंग प्रशिक्षण, ड्रिल, शारीरिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, नेतृत्वगुण तसेच विविध साहसी व मैदानी उपक्रमांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सैनिकी जीवनशैलीचा अनुभव मिळणार असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त आणि देशसेवेची भावना विकसित होण्यास मदत होणार आहे.
कर्नल धीरज मिनोत्रा, ॲडमिन ऑफिसर कर्नल अश्विन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. महात्मा गांधी विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर सतीश मोरे, कॅप्टन राजपूत सर, एनसीसी ऑफिसर सावळे सर तसेच १८ महाराष्ट्र बटालियन जळगाव येथील संपूर्ण PI स्टाफ व SM साहेब यांच्या सहकार्याने कॅडेट्सना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत आहे.

