Wednesday, September 9, 2026
Homeकृषीशेतीपूरक व्यवसायासाठी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नवाढ शक्य – रविंद्र गुर्जर, पीएमएफएमई...

शेतीपूरक व्यवसायासाठी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नवाढ शक्य – रविंद्र गुर्जर, पीएमएफएमई योजनेचे मार्गदर्शक

शेतीपूरक व्यवसायासाठी शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नवाढ शक्य – रविंद्र गुर्जर, पीएमएफएमई योजनेचे मार्गदर्शक

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 कुऱ्हे पानाचे येथे शेती जोड व्यवसाय विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे पानवेल कृषी विकास मंडळ कुऱ्हे पानाचे यांच्या कडून आयोजन करण्यात आले यावेळी शेतकरी तसेच व्यवसाय इच्छुक असलेल्या तरूणांनी कृषी विभागांतर्गत शासकीय भरघोस सवलती असलेल्या योजनांचा अभ्यास करून व्यवसायाविषयी पूर्ण मार्गदर्शन घेऊन आपल्या उत्पन्न वाढीसाठी त्याचा फायदा होईल त्यासाठी विभागामार्फत पूर्ण सहकार्य करण्याचे हमी दिली,व्यवसाय करताना नियोजन, व्यवस्थापन होणारे चुका शोधून त्यावर वेळीच उपाययोजना केल्या तर व्यवसाय वाढून चांगले प्रकारे उत्पन्न मिळते असे यावेळी रविंद्र गुर्जर पीएमएफएमई योजनेचे डी.आरपी. जळगाव यांनी केले. तसेच कुऱ्हे पानाचे येथे पानेवेली यांच्या मध्यातील दरवर्षी पाने वाया जातात त्यावर प्रक्रीया उद्योग सुरू करण्याचे त्यांनी आव्हान केले तसेच यावेळी विविध योजनांची माहिती दिली
तसेच
यावेळी उमेश पाटील जळगाव यांनी मधुमक्षिका व्यवसाय पालन,उत्पादन शासकीय अनुदान,फायदे विषयी मार्गदर्शन केले तसेच यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना विलास बारी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केली यावेळी शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले
तसेच यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनां विषयी,शेती उत्पादन वाढीसाठी गुरे पालन, कुक्कुटपालन सेंद्रीय खतासाठी पूरक असल्याचे राजेंद्र बावीस्कर सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सांगितले
.सुत्रसंचालन पानवेल कृषी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रमोद उंबरकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत रंदाळे, सदस्य संजय वराडे, नामदेव रंदाळे ,प्रविण नागपूरे माजी ग्रा.प. सदस्य,रविंद्र बोबडे, समाधान वराडे, देवराम उंबरकर , रविंद्र वराडे विनोद वराडे, मधूकर वारी, रघुनाथ वराडे, विकास बडगुजर रविंद्र वराडे, किशोर वराडे, गोपाळ रंडाळे, पवन बारी ,विनोद बारी, नामदेव वराडे, रतिलाल वराडे, काशीनाथ तेली संतोष बारी, रविन्द्र बारी ,भूषण नाईके,राकेश रंदाळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या