पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांसाठी निसर्गनिर्मितअमृतखाद्य गवत मिळण्यासाठी बांध बंधारे रासायनिक फवारेमुक्त ठेवत बंधाऱ्यावर वृक्षलागवड करण्याचा संकल्प करावा. भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील श्रावण पिठोरी अमावस्याला येणारा सण पोळा अन्नधान्य निर्मितीसाठी शेतीत शेतकऱ्याला शारीरिक श्रम करत श्रमदेवतेच्या भूमिकेत शेतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सर्जा राजा म्हणजेच बैल म्हणून ओळखले जातात सर्जा राजाचे शेतकऱ्यावर अनंत उपकार असतात ज्याप्रमाणे आपण गाडी मोबाईल या व्यतिरिक्त राहू शकत नाही त्याप्रमाणे शेतकरी बैलाविना शेती करू शकत नाही त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. जेव्हा शेतकरी बैलजोडी शेतात घेऊन जातो तेव्हा सर्जा राजाचे आवडते खाद्य ज्याची त्यांना आशा असते ते पावसाळ्यातील निसर्गनिर्मित बांध बंधाऱ्यावरील गवत ज्याला अमृतखाद्य म्हटलेले आहे. गवत हे खाल्ल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा येत असते तसेच ते पर्यावरण दृष्ट्या सुद्धा आवश्यक आहे जमिनीतील माती धरून ठेवण्याच काम गवत करत असतात परंतु शेतकरी बांध काढत शेतीचे क्षेत्र वाढवतात तसेच बांधावर असलेल्या गवतावर रासायनिक फवारे वापरून आपल्या सर्जा राजाचे अमृत खाद्य नष्ट करत आहेत तसेच त्यांना आरामासाठी असलेली झाड सुद्धा शेतामध्ये नसतात तरी आपले सर्जा राजा प्रति ज्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करतो त्याप्रती पोळ्याला आपण पुरणपोळीचा नैवेद्य देतो त्याबरोबर त्यांच्या आवडीचे शेतातील अमृत खाद्य गवत त्यांना मिळण्यासाठी आपण बांध कायम ठेवून त्यावर व इतरही चराईक्षेत्रात कुठलाही रासायनिक फवारे न मारण्याचा तसेच बांधावर पर्यावरणास अनुकूल झाडे, फळझाडे लावण्याचा संकल्प करावा. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान

