Thursday, September 10, 2026
Homeजळगावपीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणीत पोषण आहार सप्ताह उत्साहात संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणीत पोषण आहार सप्ताह उत्साहात संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणीत पोषण आहार सप्ताह उत्साहात संपन्न
​  भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    पीएम श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणीत १ ते ७ सप्टेंबर दरम्यान पोषाहार सप्ताह प्राचार्य श्री. डी. एस. नंदेश्वर सर व वरिष्ठ शिक्षिका कु. संध्या परदेशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यादरम्यान संपूर्ण आठवडाभर विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, निरोगी जीवनशैली आणि जंक फूडपासून दूर राहण्याबाबत विविध सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून जागरूक करण्यात आले.
​पहिल्या दिवशी “जंक फूड नको नको रे बाबा” या विषयावर गीत व कृतीयुक्त उपक्रमाचे आयोजन रजनी मॅडम यांच्याकडून करण्यात आले.
​दुसऱ्या दिवशी कविता वाचन स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये सचिन सर व मिस्त्री सर यांचे मार्गदर्शन लाभले.
​तिसऱ्या दिवशी वेशभूषा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी फळे, भाजीपाला व भरडधान्यांची (मिलेट्स) वेशभूषा परिधान करून पौष्टिक आहाराचा संदेश दिला. या उपक्रमाचे आयोजन संदीप सर, निलेश सर व शिवा मॅडम यांनी केले.
​चौथ्या दिवशी घोषवाक्य (स्लोगन) लेखन स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये उज्ज्वल मॅडम व सागर सर यांचे सहकार्य लाभले.
​पाचव्या दिवशी नृत्यविषयक उपक्रमांचे आयोजन ममता मॅडम व प्रियंका मॅडम यांच्याद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवले.
​सहाव्या दिवशी विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन दीपक सर व लोखंडे मॅडम यांनी केले. नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि निरोगी खाण्याच्या सवयींविषयी जागरूक करण्यात आले.
​अखेरच्या दिवशी डॉ. महेश फिरके सर यांनी विद्यार्थ्यांना जंक फूड न खाण्याचा सल्ला दिला. त्यांनी एका सुंदर व प्रेरणादायी गोष्टीच्या माध्यमातून मुलाझना पौष्टिक आहाराचे महत्त्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत समजवून सांगितले. त्यांच्या या गोष्टीने विद्यार्थ्यांना निरोगी व पौष्टिक अन्नपद्धत अंगीकारण्यासाठी प्रेरित केले.
​कार्यक्रमाच्या सांगता समारंभाप्रसंगी प्राचार्य श्री. डी. एस. नंदेश्वर सर यांनी सर्व शिक्षकांना एनर्जी ड्रिंक व फळांचे वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. अशा प्रकारे विविध रचनात्मक व ज्ञानवर्धक उपक्रमांच्या साहाय्याने पोषण सप्ताहाचा यशस्वी व प्रेरणादायी समारोप झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या