जळगाव जिल्हा परिषद CEO करिश्मा नायर यांचे आदेश : ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती !
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर (भाप्रसे) यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करून यावल तालुक्यातील मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती केली आहे.प्रशासकीय अडचणींमुळे तसेच निवडणुका वेळेत न झाल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार विस्कळीत होऊ नये म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. सर्व प्रशासकांची नियुक्ती ०८ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली असून, नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत किंवा ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती वैध राहील.
प्रशासकांना देण्यात आलेले निर्देश व नियमावली:
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आदेशात प्रशासकांसाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना व अटी निश्चित केल्या आहेत:सरपंचांचे सर्व अधिकार: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ (३) नुसार सरपंचांना मिळणारे सर्व अधिकार व कर्तव्ये आता प्रशासकांकडे असतील.आर्थिक शिस्त व लेखापरीक्षण: ग्रामपंचायतींचे हिशोब महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार असावेत. प्रलंबित ऑडिट (लेखा परीक्षण) पूर्ण करणे व आक्षेप पूर्तता करण्याची जबाबदारी प्रशासकांची असेल.कर वसुलीचे लक्ष्य: ग्रामपंचायत कराची वसुली १००% करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच कोणत्याही परिस्थितीत कर वसुली ७०% पेक्षा कमी राहू नये.अत्यावश्यक खर्च: ग्रामपंचायतीच्या स्वउत्पनातून केवळ पाणीपुरवठा, आरोग्य, दिवाबत्ती आणि वेतन यांसारख्या अत्यावश्यक बाबींवरच खर्च करावा; अनावश्यक खर्च टाळावा.
रक्कमेचा विनियोग: कर वसुलीतून पाणीपुरवठा वीज बिल भरणे, ५% दिव्यांग खर्च, १०% महिला बाल कल्याण खर्च आणि २०% मागासवर्गीय खर्चाला प्राधान्य द्यावे.
यावल तालुक्यातील ४६ ग्रामपंचायती व नियुक्त प्रशासकांची यादी:
अ.क्र.ग्रामपंचायतीचे नावनियुक्त प्रशासकाचे नावहुद्दा / पद
१आडगाव एस.बी.भदाणे विस्तार अधिकारी ( ग्रा.पं. )
२ आमोदेएस.बी.भदाणे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
३ अंजाळे ई. के. चौधरी विस्तार अधिकारी (कृषी )
४ अट्रावल आरती इंगळे शाखा अभियंता
५ बामणोदके.सी.सपकाळे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
६ भालोदके.सी सपकाळे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
७ भालशिव ई. के.चौधरी विस्तार अधिकारी (कृषी)
८ बोरावल खुर्द डी.व्ही.निळे सहाय्यक प्रशासन अधिकारी
९ बोरखेडा बु.के.सी. सपकाळे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
१० चिंचोली एस.बी.भदाणे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
११दहिगाव सरोज पाटील विस्तार अधिकारी (शिक्षण)
१२डांभुर्णी रमेश विसावळे विस्तार अधिकारी ( कृषी )
१३ डोणगाव शोभा रमेश पाटील अंगणवाडी पर्यवेक्षिका
१४ डॉ. कठोरा गणेश डाकुर शाखा अभियंता ( बांधकाम )
१५दुसखेडा जी.टी. सोनवणे विस्तार अधिकारी (कृषी)
१६ हंबरडी जी.टी. सोनवणे विस्तार अधिकारी (कृषी )
१७ हिंगोणे गणेश डाकुर शाखा अभियंता ( बांधकाम )
१८ कासवे ई.के.चौधरी विस्तार अधिकारी ( कृषी )
१९ किनगाव बु.रमेश विसावळे विस्तार अधिकारी (कृषी)
२० कोळवद अर्चना राजेंद्र आटोळे अंगणवाडी पर्यवेक्षिका
२१ कोरपावली महम्मद हबीब तडवी केंद्र प्रमुख
२२ कोसगावई.के.चौधरी विस्तार अधिकारी ( कृषी )
२३ महेलखेडी महम्मद हबीब तडवी केंद्र प्रमुख
२४ मनवेल अनिल वसंत सुरडकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी
२५ मारूळ के.सी.सपकाळे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
२६ मोहराळे विजय रंगनाथ ठाकूर केंद्र प्रमुख
२७ नावरे विजय रंगनाथ ठाकूरकेंद्र प्रमुख
२८ नायगावके.सी. सपकाळे विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
२९ निमगाव जया रणधीर नाईक अंगणवाडी पर्यवेक्षिका
३० पिळोदे खुर्द कविता किरण गोहिल केंद्र प्रमुख
३१ पिंप्री सरोज पाटील विस्तार अधिकारी (शिक्षण)
३२ पिंपरुड एन.पी.वैराळ करविस्तार अधिकारी ( सांख्यिकी )
३३ राजोरा जी.टी. सोनवणे विस्तार अधिकारी ( कृषी )
३४ सांगवी बु.एन.पी. वैराळकर विस्तार अधिकारी ( सांख्यिकी )
३५ सांगवी खुर्द जी.टी. सोनवणे विस्तार अधिकारी ( कृषी )
३६ सातोद अर्चना राजेंद्र आटोळे अंगणवाडी पर्यवेक्षिका
३७ सावखेडेसिम ई.के.चौधरी विस्तार अधिकारी ( कृषी )
३८ शिरसाड शेख इम्तियाज रियाज कनिष्ठ प्रशासन अधिकारी
३९ टाकरखेडा गणेश डाकुरे शाखा अभियंता ( बांधकाम )
४० उंटावद एस.बी. भदाणे विस्तार अधिकारी ( ग्रा.पं. )
४१ वढोदे प्र.सावदा पी. वैराळकर विस्तार अधिकारी ( सांख्यिकी )
४२ वढोदे प्र.यावल रमेश विसावळे विस्तार अधिकारी ( कृषी )
४३ वड्री कल्पना पितांबर तायडे अंगणवाडी पर्यवेक्षिका
४४ वनोली एन.पी.वैराळकर विस्तार अधिकारी ( सांख्यिकी )
४५ विरावली रमेश विसावळे विस्तार अधिकारी (कृषी)
४६ विरोदा एन.पी.वैराळकर
या आदेशाची प्रत पुढील योग्य कार्यवाहीसाठी गटविकास अधिकारी ( BDO ), पंचायत समिती यावल यांना माहिती व अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आली आहे.

