यावल नगर परिषद निवडणूक: शिंदे गटाला बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र; शहराध्यक्ष पंकज बारी यांचा आरोप
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१३
नगर परिषदेच्या प्रत्यक्ष कामकाजाशी किंवा प्रक्रियेशी काहीही थेट संबंध नसताना, केवळ राजकीय द्वेषापोटी शिवसेना (शिंदे गट) आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आखले जात आहे,असा घणाघाती आरोप शिवसेना (शिंदे गट) यावल शहराध्यक्ष पंकज बारी यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,यावल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान इच्छुक उमेदवारांच्या अर्ज छाननीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८ ते १० स्वतंत्र टेबल लावून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. सर्व कागदपत्रे, अर्जातील त्रुटी आणि वैधता तपासूनच अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अंतिम निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. या प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव—म्हणजेच अर्जावर स्वाक्षरी नसल्यामुळे—शिवसेना शिंदे गटातील एका उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरले होते.मात्र या सर्व प्रक्रियेशी नगर परिषदेचा किंवा पक्षाचा कोणताही दोष / संबंध नसताना, काही यावल शहरातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी
शहरात शिंदे गटाची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बदनामी करत आहे.यामुळे यावलमधील राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शहराध्यक्ष पंकज बारी यांनी स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या बदनामीच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.” पक्षावर बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.असा रोखठोक सवाल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
‘आरोपांचे राजकारण सोडा, शहराच्या विकासावर बोला’
शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष पंकज बारी यांच्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. “वैयक्तिक चिखलफेक आणि बिनबुडाचे आरोप थांबवून यावल शहराचा सर्वांगीण विकास हाच एकमेव अजेंडा असायला हवा.
दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला यावलची जनता थारा देणार नाही,” असा ठाम विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
आणि यावलचे अतिक्रमण हे फक्त एक ते दीड महिन्यासाठी पुढे लोटण्यात आलेले आहे आणि या कालावधीमध्ये कोणताही विकास यावल शहराचा मागे पडणार नाही सर्व धर्मीयांचे आता सण आहेत असाही मुद्दा पंकज बारी यांनी तहसीलदार मॅडम समोर मांडला
त्यात आमदार अमोल दादा जावळे यांनी सुद्धा सहकार्य केले व नगराध्यक्ष सौ.छायाताई पाटील यांनी सुद्धा सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे पंकज भाऊ बारी यांनी आभार मानले

