Sunday, September 13, 2026
Homeजळगावहरतालिका, गणेश चतुर्थी घरातील आनंदाबरोबर निसर्ग राजासाठी प्रसादरुपी संगोपनासहित वृक्ष लागवड करावे....

हरतालिका, गणेश चतुर्थी घरातील आनंदाबरोबर निसर्ग राजासाठी प्रसादरुपी संगोपनासहित वृक्ष लागवड करावे. डॉ. सुरेंद्सिंग पाटील

हरतालिका, गणेश चतुर्थी घरातील आनंदाबरोबर निसर्ग राजासाठी प्रसादरुपी संगोपनासहित वृक्ष लागवड करावे. डॉ. सुरेंद्सिंग पाटील*.                                                           भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    14 सप्टेंबर हरतालिका तसेच श्रीगणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी आहे. महिलांचा पवित्र सण हरतालिका माता पार्वतीने भगवान शिवशंकर हे आपले पती व्हावेत म्हणून भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्याकरता भाद्रपद शुक्ल तृतीयेला तपश्चर्येला बसल्या व त्यादिवशी भगवान शंकरांनी त्यांना पत्नीरूपात स्वीकारण्याचे वचन दिले. प्रत्येक महिला व कुमारीका हरतालिका हे कठीण व्रत करत असतात कुमारीका चांगला वर मिळावा म्हणून तसेच महिला अखंड सौभाग्यवती तसेच सुखी कुटुंबासाठी भगवान शिव शंकरांची आराधना करून उपवास करत असतात. भगवान शंकरांना सर्वात प्रिय बेलाचे पान. धोत्र्याचे, गोकर्ण कन्हेरा चे फुल कायमस्वरूपी भक्तांना हे मिळावे यासाठी शिवमंदिरांच्या आसपास, ओपन स्पेस मध्ये तसेच विविध ठिकाणी ही झाडे संगोपनासहित लावावी तसेच लावण्याचा संकल्प करावा. श्री गणेश चतुर्थी म्हणजे सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता, श्री गणेशाचे घरोघरी आगमनाचा दिवस घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना होत असते प्रत्येकाने पर्यावरण पूरक मातीच्या गणपतीची स्थापना करत आपल्या घरासमोर दीर्घकाळ टिकणारे वृक्ष लावावे अनंत चतुर्दशी या दिवशी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचे विसर्जन लावलेल्या झाडाजवळ करावे त्यामुळे आपल्यावर येणारे दुःख, विघ्न हे गणेशरुपी झाड दुःखहर्ता, विघ्नहर्ता रूपात कायमस्वरूपी आपले संरक्षण करत सुख देण्याचं काम करेल श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत घराघरात गल्लीगल्लीत प्रत्येक गावात मोठ्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते आपण गणपती बाप्पासाठी गणपती स्थापने दरम्यान पाच विविध प्रकारची फळ ठेवतो त्या पद्धतीने ज्याच्याजवळ जागा असेल तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रकारची देवासाठी लागणारी फळांची झाडे लावावीत तसेच आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात रोज फुलांचा नवीन हार लावतो तसेच 21 दूर्वा वाहतो त्याच पद्धतीने विविध गणेश मंडळांनी तसेच विविध भागातील प्रतिष्ठित नागरिकांनी गणेशमय वातावरणासाठी निसर्ग राजास प्रसादरुपी आपापल्या भागात 21 विविध प्रकारची पर्यावरण पूरक देशी झाडे आपापल्या प्रभागात असलेल्या ओपन स्पेसमध्ये, रस्त्याच्या कडेला मंडळातील तसेच घरातील प्रत्येक सदस्याने संगोपनासहित लावत आपलेआदरणीय प्रधानमंत्री यांच्या ॔॔॔एक पेड माँ के लिये॓॓॓॓॓ अभियान 3 संकल्पनेला आपला सहभाग नोंदवत आपले गाव आपला परिसर हरितमय करत प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करूया. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या