प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ येथे संचालक मंडळाने दिलेली आश्वासनांची पूर्तता….
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ च्या दिनांक 13/09/2026 वार रविवार रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सहकार- लोकसहकार पॅनेलचे प्रमुख योगेश इंगळे, सभेचे अध्यक्ष सभापती प्रदीप सोनवणे व उपसभापती कल्पेश पाटील, संचालक – संदीप गायकवाड, किरण पाटील, अनिल पाटील, शेख सलीम शेख लाल, श्रीकांत मोटे, विनोद सोनवणे, विक्रांत चौधरी, संदीप पवार, सोपान पारधी, हरिश्चंद्र बोंडे, समाधान जाधव, सियाज तडवी, जितेंद्र गवळी, प्रदीप सोनवणे, गोविंदा ठाकरेपाटील, गोपाल पाटील व संचालिका ज्योती राणे, मीरा पाटील व ग स संचालक निलेश पाटील* उपस्थित होते. सदर सभेत मागील आर्थिक वर्षाच्या कारभाराविषयी चर्चा करण्यात आली आणि गटाने दिलेल्या आश्वासनांपैकी बहुतेक आश्वासनांची पूर्तता झाली असल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संस्थेने 1 वर्षात भरीव कामगिरी केलेलबाबत कॉस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष बापू साळुंके व प्रगती पॅनेलचे सदस्य सुनील माळी व दिलीप जवरे यांनी केले.
*सभेत झालेले जाहीर निर्णय*
*ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी कर्ज वाटप*
*जामीन कर्जामध्ये ५०००० रु. (२५००० रु. प्रति जामीन) वाढ*
*विशेष कर्जामध्ये १००००० रु. वाढ*
*सर्व प्रकारच्या खर्चात अंदाजपत्रकापेक्षा खर्च कमी*
*प्रथमच संस्था सभासदांच्या बँक खात्यात लाभांश वर्ग करणार*
*मागील अपहाराच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत ८८ अ ची चौकशी सुरू जबाबदारी निश्चित केली जाणार*
*खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी शुभमंगल योजना शुभारंभ*
*सभेत झालेले कठोर निर्णय*
o सक्तीने थकबाकी वसूली
*संस्थेत अंबलबजावणी झालेले निर्णय*
o शेअर्स मर्यादा ५०००० रु. ने कमी
o संस्थेचा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी स्वच्छेने समंती घेऊन नवीन पगार कपात
o १००००००० रु. (एक कोटी) च्या थकलेली थकबाकी कर्ज,व्याज वसूली
o काटकसर करत संस्थेची बँकेत ठेव
o स्वतंत्र ऑनलाइन अॅप सुरू करून, सभासदला स्वत:च्या खात्याची माहिती
o विक्रमी नफा – ११९३९११० रु.
o सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा पुन्हा सुरू
o मयत सभासदाला संपूर्ण कर्ज माफ
o वैद्यकीय मदत योजना
o अपघात विमा योजना
o मयत सभासद कुटुंब सहाय्यता निधी योजना
o संचालक मंडळाच्या मागणीनुसार मागील ४ वर्षांचे लेखापरीक्षण सुरू
o कर्मचाऱ्यांना धान्य अॅडव्हान्स, बोनस, अतिरिक्त पगार सर्व बंद
o संस्थेचा स्वतंत्र लोगो अनावरण
o संस्था १०० % संगणीकृत
o अफरातफर व अपहार सहभागी कर्मचारी बडतर्फ कठोर निर्णय
अशा प्रकारचे सभासदांसाठी निर्णय घेण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील सर्वात कमी व्याजाने कर्ज देणारी पतपेढी म्हणून या पतपेढीचे नावलौकिक आहे आणि सभासदांनी ठेवलेल्या विश्वासावर कामकाज सुरळीत चालले आहे अशा प्रकारचे व्यक्तव्य पतपेढीचे सभापती प्रदीप सोनवणे यांनी केले.

