Sunday, September 13, 2026
Homeजळगावमहिलांनी स्वावलंबी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

महिलांनी स्वावलंबी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

महिलांनी स्वावलंबी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे

टहाकळी येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              वरणगाव ता भुसावळ :
महिलांना स्वावलंबी,आत्मनिर्भर तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील टहाकळी येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भावना महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून निम्जाय फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल बक्षे उपस्थित होत्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नंदाताई निकम, तालुकाप्रमुख रेखा देशमुख, उपजिल्हाप्रमुख सविता माळी, तृप्तिताई महाजन, नगरसेविका दिशा महाजन, भविता पालेंकर, वर्षा महाजन, प्रीती चौधरी, राजेंद्र चौधरी, प्रकाश निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना तालुकाप्रमुख रेखा देशमुख यांनी महिलांनी केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता आपल्या कौशल्याचा विकास करून व्यवसाय व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज व्यक्त केली.

महिलांच्या सक्षमीकरणातून कुटुंबासोबतच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्यासाठी महिलांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे,” असे सुरेखा देशमुख यांनी सांगितले.

व्यवसायाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन –
प्रीती चौधरी यांनी महिलांना व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित मान्यवरांनीही महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित केले. महिलांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना व्यावसायिक रूप देऊन आर्थिक प्रगती साधावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग लाभला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपजिल्हाप्रमुख सविता महाजन यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या