Monday, July 21, 2025
Homeजळगावअमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध

अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध

अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकुन परिट धोबी समाज व संत गाडगेबाबा प्रेमीच्या भावना दुखावल्या बद्दल स्वयंघोषित लेखक विजय शेडगे याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे


अमळनेर येथे ‘ संत गाडगे बाबा की जय ‘ आणि ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘ असा गजर करीत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजय शेडगे यांच्या विरुद्ध त्वरित कडक कारवाई करण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे परिट समाज उत्तर महाराष्ट्रप्रसिद्धी राकेश वाघ अमळनेरचे अध्यक्ष रवींद्र जाधवध रणगावचे अध्यक्ष छोटू जाधव पारोळ्याचे अध्यक्ष विजय वाघ पिळोदाचे अध्यक्ष किशोर निकुंभ विनोद जाधव सर गंगाराम वाल्हे दिपक वाल्हे , अनिल वाघ, भरत जावदेकर माजी अध्यक्ष गुलाबराव जाधव, अमृत जाधव , मोतीलाल जाधव, प्रा. अनिल पवार , जगतराव निकुंभ, हेमंत महाले , विकी जाधव, प्रवीण वाघ व तालुक्यातील समाज बांधव व माता-भगिनी व संत गाडगेबाबा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या