Wednesday, September 16, 2026
Homeगुन्हागुलाल अंगावर पडल्याने वाद चिघळला; दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

गुलाल अंगावर पडल्याने वाद चिघळला; दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

गुलाल अंगावर पडल्याने वाद चिघळला; दोन भावांना मारहाण, दगडफेकीत वाहनाची तोडफोड !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गुलाल अंगावर पडल्याच्या कारणावरून बोलण्यासाठी गेलेल्या तरुणासह त्याच्या भावाला मारहाण करून दगडफेक करण्यात आल्याची घटना शहरातील गणेशनगर परिसरात घडली. या दगडफेकीत नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम रविंद्र सोनवणे (वय २०, रा. कलाभवन नेहते कॉम्प्लेक्स) हा १४ सप्टेंबर रोजी रात्री त्याचा भाऊ शुभम सोनवणे याच्यासोबत सबजेलच्या मागील बाजूस राहणाऱ्या आत्याकडे जेवणासाठी गेला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे घरी परतत असताना त्यांच्या ओळखीचे विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर व आणखी एक जण गुलाल उधळत होते.यावेळी शुभम सोनवणे यांच्या अंगावर गुलाल पडल्याने ओम त्यांच्याशी बोलण्यासाठी गेला. मात्र, यावेळी वाद वाढला आणि तिघांनी दोन्ही भावांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.यानंतर रस्त्यावर पडलेले दगड दोघांवर फेकण्यात आले. त्यातील एकाने दगडफेक केल्यानंतर लाकडी दांडक्याने शुभम सोनवणे यांच्या कमरेवर मारहाण केल्याने ते जखमी झाले.दरम्यान, झालेल्या दगडफेकीत परिसरातील ओम सोनवणे यांच्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले.

या घटनेप्रकरणी ओम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या