Saturday, September 26, 2026
Homeआरोग्यसेवा संकल्प अभियाना’अंतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा जळगावचा उपक्रम; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            : ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा जळगावच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पंचायत समिती जळगाव येथे विशेष रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे, ग्रामपंचायत अधिकारी युनियन जळगावचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ तसेच विस्तार अधिकारी व कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पुलकेशी केदार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

शिबिरात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. चंद्रशेखर वराडे, भोजराज फालक, दिनेश देवराज, नरेंद्र साळुंखे, किरण फारसे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तालुका संघटनेचे अध्यक्ष बबन आप्पा वाघ यांनी आभार मानले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या