जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२६ येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल,मथे शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,सर्जनशीलता, प्रयोगशीलता तसेच पर्यावरण व शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनासाठी इयत्ता ५ वी ते ७ वी हा पहिला गट आणि इयत्ता ८वी ते १०वी हा दुसरा गट असे दोन गट करण्यात आले. होते.प्रत्येक गटातील दोन विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विविध विज्ञानविषयक उपक्रम,प्रयोग व प्रतिकृती तयार करून सादर केल्या.विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनासाठी जलसंकलन, जलउपयोग,जलपुनर्वापर व जलसंवर्धन अन्न,कृषी व आरोग्य तसेच शाश्वतेसाठी भारतीय ज्ञान प्रणालीचा वापर हे विविध विषय देण्यात आले होते.या विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पना,विविध विज्ञान प्रतिकृती व प्रयोग सादर करून आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम तसेच इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.विज्ञान प्रदर्शनाची रूपरेषा व नियोजन शाळेच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड मॅडम व राजश्री लोखंडे मॅडम यांनी केले.

विज्ञान विभागातील गायत्री चौधरी मॅडम,प्राजक्ता वाणी मॅडम,माधुरी भारंबे मॅडम व संस्कृती फेगडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांना योग्य दिशा देत त्यांच्या वैज्ञानिक विचारांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले.
या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना निरीक्षण,संशोधन, प्रयोगशीलता,समस्या-निराकरणसादरीकरण कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात विज्ञान परिषद व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

