Sunday, September 27, 2026
Homeजळगावविजय पंडित (कुंभार) यांची 'कुंभार समाज सामाजिक संस्था' यावल तालुकाध्यक्षपदी निवड.

विजय पंडित (कुंभार) यांची ‘कुंभार समाज सामाजिक संस्था’ यावल तालुकाध्यक्षपदी निवड.

विजय पंडित (कुंभार) यांची ‘कुंभार समाज सामाजिक संस्था’ यावल तालुकाध्यक्षपदी निवड.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि.२७
‘कुंभार समाज सामाजिक संस्था, जळगाव’ च्या वतीने समाज संघटनेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. यावल येथील श्री. विजय देविदास पंडित (कुंभार) यांची कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या यावल तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे,उपाध्यक्ष सुभाष पंडित, आणि सचिव सखाराम मोरे यांच्या स्वाक्षरीने त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील कुंभार समाजातील सर्व बंधू-भगिनींना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आणि संस्थेची ध्येय-धोरणे सर्वसामान्य कुंभार समाजातील घटकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्थानासाठी विजय पंडित कटिबद्ध राहतील,असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

विजय पंडित यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुंभार समाजातील विविध मान्यवरांनी,स्नेहीजनांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या