Tuesday, November 3, 2026
Homeजळगावरावेर गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात संपन्न   

रावेर गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात संपन्न   

रावेर गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात संपन्न                                                                      रावेर    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शहरात गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीने शांततेत आणि उत्साहात झाली. शहरातील १७ गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी ३ वाजता पाराच्या गणपती मंदिर पासून सार्वत्रिक महाआरती करण्यात आली . मिरवणूकीत

अप्पर पोलीस अधिक्षक संदीप गावित, एसडिपीओ अनिल बडगुजर, काँग्रेसआय जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी , शांतता कमेटीचे सदस्य पद्माकर महाजन, अशोक शिंदे ,दिलीप कांबळे, बाळु शिरतुरे, उपनगराध्यक्ष आसीफ मोहमंद , मुसलीम पंच कमेटी चे शेख ग्यास ‘ यूसूफ खान ‘ वसीम खान ,जाविद खान उपस्थित होते.
तर शहरातील डॉ संदीप पाटील, अनिल अग्रवाल, संतोष अग्रवाल, प्रल्हाद महाजन, उमेश महाजन व असंख्य नागरिक होते.
आरती नंतर पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात एक मागे एक शिस्तीत विसर्जन मार्गाने मिरवणूक पुढे सरकत असताना विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशे तसेच हनुमान गणेश मंडळ, चितोडे वाणी समाज व इतर मंडळांचे मिरणुकीत लेझीम पथक होते.
यंदाच्या मिरवणुकीतील गणपतीच्या विशाल आणि आकर्षक मूर्ती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांततेत विसर्जन सोहळा पार पाडला.
मिरवणुकीत दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, अमूल बच्छाव, उपनिरीक्षक मनोज महाजन,सखाराम कांबळे, अंमलदार, शिपाई, होमगार्ड, एसआरप, आरसीएफ सह मोठा फौजफाटा बंदोबस्तात लागला होता .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या