Friday, October 2, 2026
Homeजळगावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांनी सेवा पंधरवडा साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांनी सेवा पंधरवडा साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांनी सेवा पंधरवडा साजरा केला.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         दि.२
भारतीय जनता पक्ष यावल मंडळ महिला मोर्चा पुर्व मंडळाच्या वतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा भाव समर्पण आणि जनसेवेच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत ठिकठिकाणी सेवा पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांचा भाजपा जिल्हा पूर्व चिटणीस सौ.मेघा विजय कासार यावल,जिल्हा पूर्व चिटणीस सौ. ज्ञानेश्वरी महाजन राजोरा
ता.अध्यक्ष मंडळ सौ.रंजना पाटील यावल, जिल्हा पूर्व सोशल मीडिया संयोजिका श्रीमती सरला राजेश कवडीवाले यावल,नगरसेविका सौ.शुभांगी येवले यावल,नगरसेविका सौ. सविता नन्नवरे या सर्वांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशस्तीपत्र फुलगुछ व भेट वस्तू देउन सन्मानित करण्यात आले. व लहान मुलांना खाऊ वाटप करुन सेवा भाव संकल्पनेचा कार्यक्रम यशस्वी पणे साजरा करण्यात आला.

अंगणवाडी केंद्र म्हणजे गाव/शहर पातळीवर महिला आणि बालकांसाठीची सगळ्यात महत्वाची सरकारी सुविधा आहे.
महिला व बालकांच्या हितासाठी अंगणवाडीत काय सुविधा मिळतात ..

ICDS ची संकल्पना म्हणजे – कमी खर्चात,स्थानिक साधनांतून,अंगणातच मुलांची चांगली देखभाल आणि विकासाचे केंद्र. हे केंद्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस चालवत आहे.

लाभार्थी कोण ?
महिला आणि मुले,विशेषतः 0 ते 6 वर्षाखालील मुले,गरोदर महिला,स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली

अंगणवाडी केंद्रातून प्रमुख सेवा ज्या येथे मोफत दिल्या जातात:
पूरक पोषण आहार: लहान मुले, गरोदर व स्तनदा मातांना गरम ताजा आहार, THR (Take Home Ration) 2. पूर्व-प्राथमिक शिक्षण: 3 ते 6 वर्षाच्या मुलांना आनंददायी शिक्षण, खेळातून शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण: मातांना बाळाच्या संगोपनाबाबत माहिती व प्रशिक्षण, लसीकरण: आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण, आरोग्य तपासणी: नियमित वजन, उंची, कुपोषण तपासणी, संदर्भ सेवा : गंभीर कुपोषित, आजारी बालकांना ग्रामीण रुग्णालयात पाठवणे, “बेटी बचाव – बेटी पढाओ”: मुलींचा जन्मदर वाढवणे, शिक्षण आणि संरक्षण. यासाठी महाराष्ट्रात लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री अंगणवाडी मार्फतच राबवली जाते.”सही पोषण – देश रोशन”: पोषण अभियान अंतर्गत दर महिन्याला वजन, हिमोग्लोबिन तपासणी, आणि कुपोषण मुक्तीसाठी समुपदेशन. “बाल विवाह कायद्याने गुन्हा आहे”: अंगणवाडी सेविकेला बालविवाह रोखण्याची आणि तक्रार करण्याची कायदेशीर जबाबदारी दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या