Friday, October 2, 2026
Homeजळगावयावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना इतिहासातील राजकीय नेते यांच्या विषयी व त्यांच्या कामगिरीबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम व सेमी माध्यमाच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम,पर्यवेक्षिका गौरी भिरुड व राजश्री लोखंडे उपस्थित होत्या .
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमा प्रसंगी हर्षाली बारी मॅम यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती सांगितली व कुंदा नारखेडे यांनी महात्मा गांधीजींबद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या पांडव यांनी केले तर आभार प्रदर्शन गायत्री चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोलाचे सहकार्य लाभले.अशाप्रकारे लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या