शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यावल तालुका काँग्रेस आक्रमक.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावल तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. प्रशासनाने या समस्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने यावलच्या तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावल तालुक्यातील शेतकरी व नागरिक सध्या अनेक गंभीर अडचणींना सामोरे जात आहेत. त्यांच्या समस्यांची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन दिलासा द्यावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —
दुष्काळ आढावा व उपाययोजना: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना लागू कराव्यात.
बागायतदारांना आर्थिक मदत: अडचणीत सापडलेल्या बागायतदार शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी.कोरडवाहू शेतकऱ्यांना मदत: कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी.
कर्जमाफी योजना: शेतकरी कर्जमाफी योजना तातडीने आणि प्रभावीपणे लागू करण्यात यावी.
पीक विमा योजना : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी १ रुपया पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्यात यावी.
घोटाळेबाज ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व कथित गैरव्यवहाराप्रकरणी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
SIR मधील अटी रद्दीकरण: SIR मधील शेतकरी विरोधी व जाचक अटी तातडीने रद्द करण्यात याव्यात.
जलजीवन मिशन भ्रष्टाचाराची चौकशी: जलजीवन मिशन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात व शेतकरी-नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका पक्षाने घेतली आहे.
या निवेदनावर यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पाटील, लीलाधर सेठ, अमोल भिरूड, शेख नईम शेख शरीफ, मो. हनीफ मो. याकूब, सुनील पाटील, शेख लाल शेख रशीद, शरीफुद्दीन सिराजुद्दीन, युनिसखान युसुफ खान, अभय महाजन, टेनीराम सोनार, धीरज कुरकुरे, शरद पाटील, गफूर तडवी, करीम मन्यार, समीर खान मेंबर, कमाल तडवी, पिरन तडवी, निजाम शेख, जगदीश डोळे, अनिल कोळी, सरफराज पिंजारी,किरण सोनवणे, युनूस सेट, राजू वानखेडे,अशपाक शाह गफार शाह, युवराज भंगाळे, चंद्रकांत चौधरी, प्रमोद पाटील, लतीफ तडवी, सबदल तडवी, सरफराज तडवी, सायबू तडवी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्या असून ते यावेळी उपस्थित होते.

