Wednesday, October 7, 2026
Homeगुन्हापोलिस अधिक्षक यांनी राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत रावेर पोलीसांनी गोपनिय माहीतीच्या आधारे...

पोलिस अधिक्षक यांनी राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत रावेर पोलीसांनी गोपनिय माहीतीच्या आधारे शेतातील चोरीस गेलेल्या मोटार पंप चोरांच्या आवळल्या मुसक्या

पोलिस अधिक्षक यांनी राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत रावेर पोलीसांनी गोपनिय माहीतीच्या आधारे शेतातील चोरीस गेलेल्या मोटार पंप चोरांच्या आवळल्या मुसक्या
रावेर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दि. ०६/१०/२०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गुरंन -०४४४/२०२६ प्रमाणे फिर्यादी मोहन लालचंद कावडकर रा. रमजीपुर यांच्या शेतातुन ०५ एच.पी. समुराई कंपणीची पाण्याची मोटार ही त्यांच्या शेत गट नं- १६२२/२ मधुन दि. ०३/१०/२०२६ च्या रात्री कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरुन नेली असले बाबत गुन्हा दाखल आहे.

मा. पोलिस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी मागील काही दिवसांपासुन शेतातुन चोरी जाणाऱ्या शेतातील मोटार, कॉपर वायर बाबत विशेष मोहीम राबविली होती. सदर विशेष मोहीमे अंतर्गत रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेत्रुत्वााखाली रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, बिट अमंलदार व रावेर गुन्हे शोध पथक यांचे पथक तयार करुन शेतातील चोरी जाणाऱ्या मोटार, कॉपर वायर या बाबत गोपनिय माहीती तसेच तांत्रिक विष्लेशनाव्दारे आरोपीतांची ओळख पटविण्याचे आदेशीत केले होते.

रावेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तसेच बिट अंमलदार यांना सदर गुन्हयात तपास करीत असतांना काही इसम हे चोरीच्या मोटार रमजीपुर गावांत विक्री करीता आणणार असल्याची खात्रिलायक माहीती प्राप्त झाली होती. सदर माहीतीच्या आधारे संशयीत इसम ०१) राजेंद्र सुधाकर महाजन वय ३० ०२) उमेश प्रकाश धनगर वय-२३ ०३) रितेश जग्गन्नाथ कावडकर वय- २३ ०४) आनंदा गोपाळ धनगर वय-२८ सर्व रा. रमजीपुर ता. रावेर यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली देत गुन्हयातील चोरीस गेलेली विदयुत मोटार पंप काटुन दिलेला आहे. आरोपीतांनी अशाचप्रकारे अजुन चोरी केली आहे काय ? आरोपीतां सोबत अजुन कोणी साथीदार आहेत काय ? आरोपीतांनी चोरीचा माल अजुन कोणास विकला आहे ? याबाबत सखोल तपास चालु आहे. आरोपीतांना सदर गुन्हयात अटक केली असुन सदर आरोपीतांना मा. न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी ची मागणी केली आहे.

जनतेस आवाहन: रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी जनतेस आवाहन केले आहे की, रावेर शहरात कोणी जुनी मोटार, कॉपर वायर, विदयुत पंप विक्री करणारे अथवा खरेदी करणारे व्यक्तीबांबत काही माहीती असल्यास समक्ष पोलीस निरीक्षक किवा रावेर पोलिस स्टेशन येथे माहीती दयावी सदर माहीती देणाऱ्याचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.

सदर कार्यवाही ही मा. श्रीकांत धिवरे सो पोलीस अधिक्षक यांच्या विषेश मोहीमे अंतर्गत मा. श्री संदीप गावीत सो अपर पो. अधिक्षक जळगांव परीमंडळ, तसेच मा. श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशन चे पो.नि. संदीप पाटील, स.पो.नि अमुल बच्छाव, पो. हे. कॉ सिकंदर तडवी, पो.कॉ. योगेश पाटील रावेर गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख यांनी केली आहे. पुढील तपास बिट अमंलदार सिकंदर तडवी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या