Friday, October 9, 2026
Homeकृषीयंदाच्या महाभयंकर दुष्काळात जिल्हाभरातील 'बहुवर्षीय फळबागा' वायणण्यासाठी विषेश नियोजन करा : राष्ट्रवादी...

यंदाच्या महाभयंकर दुष्काळात जिल्हाभरातील ‘बहुवर्षीय फळबागा’ वायणण्यासाठी विषेश नियोजन करा : राष्ट्रवादी काँग्रेस बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील.

यंदाच्या महाभयंकर दुष्काळात
जिल्हाभरातील ‘बहुवर्षीय फळबागा’ वायणण्यासाठी विषेश
नियोजन करा : राष्ट्रवादी काँग्रेस बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील.

यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि.९
यंदाच्या महाभयंकर दुष्काळात
जिल्हाभरातील ‘बहुवर्षीय फळबागा’ वाचवणण्यासाठी विषेश नियोजन करा अशी मागणी बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष आबा पाटील. यांनी केली.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार गुरुवार ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आमदगाव बोदवड परिसरातील सिंचन प्रकल्पावर जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष भेट घेत बहुवर्षीय फळ बागायतदार शेतकरी डॉ.प्रवीण पाटील,मनुर बु.अविनाश पाटील मनुर खुर्द,आबा पाटील मानमोडीकर,मुन्ना पाटील, आमदगाव सरपंच संभाजी पारधी,माजी सरपंच मनोज बोदडे यांनी तालुक्यातील बहु वर्षीय फळबाग लिंबू,मोसंबी,
सीताफळ,पेरू लागवड असून गेल्या २ महिन्यापासून दडी मारलेला पाऊस आता पुढील ८ महिने बरसणार नाही म्हणजे १० महिने पाऊस पाण्याविना बागेतून उत्पन्न होणे दूर पण जगवणे देखील आव्हान असून शेतकरी या दुष्काळात हतबल झाल्याने आता जिल्हाधिकारी यांनी आता विशेष नियोजन करून या फळ बागां वाचवण्यासाठी उपाययोजनेतून “पालकत्व स्वीकारा” अशी मागणी केली आहे आणि पालकत्व न स्वीकारल्यास बागा नामशेष होतील…
त्यांना वाचवा जगवा तसेच फळपीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी कळकळीची विनंती वजा आवाहन करत सरकारच्या पंचनामा व मदत हे राज्य स्तरीय धोरण असून यात बराच अवधी जाईल,त्या मदतीचे जे होईल ते होईल मात्र आजच तातडीने जमिनीत ओलावा कायम रहावा म्हणून संपूर्ण बागेत विड मॅट, मलचींग,बोर्डो पेस्ट,बाष्पीभवन कमी होण्याच्या फवारण्या,पाणी ट्रँकर व शेततळ्यांची निर्मिती केली जावी या अत्यंत गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आबा पाटील, फळबागयतदार डॉ.प्रवीण पाटील,अविनाश पाटील यांनी चर्चेतून मागणी केली. दुष्काळाच्या काळात पहिल्या ट्रिगर मधे भुसावळ विभाग प्रांतअधिकारी जितेंद्र पाटील,
बोदवड तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे,ता.कृषी अधिकारी
अनिल गावित या सगळ्यांच्या कामावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हास्तरावर महसूल,जिल्हा कृषी विभाग यांची यासाठी लवकरच विशेष नियोजन बैठक लाऊन उपाययोजना करण्यात येतील असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आश्वासित केल्याची माहिती आबा पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ) यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या