Saturday, October 10, 2026
Homeजळगावभुसावळच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

भुसावळच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

भुसावळच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

सोमवारपासून घटस्थापनेने प्रारंभ
कुंकुमार्चन, सप्तशती पाठ, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळ      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      शहरातील खडका रोडवरील पुरातन व जागृत श्री महालक्ष्मी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाटील व बऱ्हाटे परिवारासह परिसरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घटस्थापनेची विधिवत पूजा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत सुधीर पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. नवरात्रोत्सवात कुंकुमार्चन, पूजा, आरती, अष्टमीला होम-हवन, सप्तशती पाठ आणि महिला भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी माता मंदिर समिती, खडका रोड, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनंदिन आरतीची वेळ निश्चित
नवरात्रोत्सव काळात मंदिरात दररोज सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता आरती होणार आहे. मंदिरात होणाऱ्या दैनंदिन कार्यक्रमांची माहिती एक दिवस आधी व्हॉट्सॲप समूहाद्वारे भाविकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी या सूचनांची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी सुधीर पाटील, प्रकाश पाटील, लीलाधर भारंबे, चंद्रकांत पाटील, खिलेश बऱ्हाटे, अभिषेक पाटील, ज्ञानदेव भारंबे (माऊली), संजय ब-हाटे, राठोड यांच्यासह महालक्ष्मी ग्रुपचे सदस्य आणि परिसरातील भाविक परिश्रम घेत आहेत. नऊ दिवस मंदिरात भक्तिमय वातावरण राहणार असून, भाविकांना धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या