Friday, October 9, 2026
Homeजळगाववरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी २८ कोटींचा निधी मंजूर

वरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी २८ कोटींचा निधी मंजूर

वरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी २८ कोटींचा निधी मंजूर

एस.टी.पी. प्रकल्पाला मंजुरी; कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी

वरणगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

वरणगाव शहरातील सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प (एस.टी.पी. प्लांट) उभारण्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा लोकनेत्या ना. रक्षा खडसे यांच्या माध्यमातून आणि वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने निर्माण होणाऱ्या विविध समस्या लक्षात घेता एस.टी.पी. प्रकल्पाची मागणी गेल्या काही काळापासून होत होती. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होऊन स्वच्छता व पर्यावरणाच्या दृष्टीने मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे काम कोणत्याही विलंबाविना लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली.
वरणगावच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दृष्टीने २८ कोटींच्या एस.टी.पी. प्रकल्पाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
या निधी मंजुरीबद्दल वरणगाव शहरातील नागरिकांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे आणि वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांचे भाजपा शहराध्यक्ष सचिन माळी, तालुका चिटणीस महेश सोनवणे, राजेश इंगळे, नगरसेवक नितीन खाचणे,अशोक काळे, शहर सरचिटणीस प्रफुल फालक यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या