खानदेशी ब्लॉगर चि. तुषार कोळी यांचा पाचोरा येथे विशेष सन्मान!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशनात विशेष सन्मान ट्रॉफी देऊन गौरव

पाचोरा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने पाचोरा येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशनात रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊसचे संचालक आणि खानदेशी ब्लॉगर चि. तुषार रामचंद्र कोळी (rishi__1408) यांना विशेष सन्मान ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे रावेर परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
चि. तुषार रामचंद्र कोळी हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र संघटक तथा दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) यांचे लहान बंधू आहेत.
या अधिवेशनाला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून खानदेशची संस्कृती, स्थानिक वैशिष्ट्ये आणि परिसरातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या तुषार कोळी यांचा या विशेष सन्मानाने गौरव झाला आहे.
या सन्मानाबद्दल चि. तुषार रामचंद्र कोळी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎉

