वरणगाव शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान.
*वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

पंतप्रधान आदरणीय मा.नरेंद्र मोदी यांच्या जन सेवेच्या कार्य प्रेरणेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत वरणगाव शहरातील अंगण का मिलन उपक्रम अंत्यंत उत्सवात पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अंगणवाडीतील चिमुकल्यांना खाऊचे वाटत करण्यात आले.
महीला भाजप प्रदेशाध्यक्षा तथा आमदार सौ.चित्राताई वाघ व नामदार संजय भाऊ सावकारे व नामदार रक्षाताई खडसे व जळगाव महीला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.संध्याताई महाजन यांच्या सुचनेनुसार तसेच सौ.रजनीताई संजय सावकारे तसेच कल्पनाताई झांबरे पूर्व सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम
नगरसेविका व या कार्यक्रमाच्या संयोजक सौ.शामलताई अतुल झांबरे यांनी आयोजित केला होता.
सदर कार्यक्रम प्रसंगी त्यांना भुसावळ पूर्व मंडळाचे प्रभारी अध्यक्ष केले होते. तसेच महीला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ.रंजना पाटील,महीला मोर्चा उपअध्यक्ष चारुलता कोल्हे, महीला शहर अध्यक्ष सौ. संगीता वंजारी, यांच्यासोबत होत्या. भुसावल तालुका अध्यक्ष पूर्व प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सचिन माळी, उपनगराध्यक्ष अरुणा ताई इंगळे व सर्व सभापती व सर्व नगरसेविका व नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून वरणगाव शहरातील 32 अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस अशा 64 महिलांचा सत्कार केला. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

